लालबाग-परळमध्ये मराठी ग्रंथ दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालबाग-परळमध्ये मराठी ग्रंथ दिंडी
लालबाग-परळमध्ये मराठी ग्रंथ दिंडी

लालबाग-परळमध्ये मराठी ग्रंथ दिंडी

sakal_logo
By

वडाळा, ता. २८ (बातमीदार) ः मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडीतर्फे रविवारी (ता. २७) लालबाग गड ते परळ नाका येथे मराठी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या सोहळ्यात मराठमोळ्या पारंपरिक वेषात व टाळ, मृदुंग, ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात एकच जल्लोष करीत मराठी ग्रंथ दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रमुख उपस्थितीत होती. मनसे राज्य उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष नंदकुमार चिले, राज्य सरचिटणीस सुप्रिया दळवी, विभाग अध्यक्षा नम्रता पवार, उपविभाग अध्यक्ष संतोष नलावडे, चेतन पेडणेकर, विलास सावंत, सचिव नंदू घाडीगांवकर, विक्रांत विचारे, शाखा अध्यक्ष निलेश इंदप तसेच लालबाग-परळमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top