
पालघरमध्ये पाच रेतीचोरांना अटक, ४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पालघर : पालघरमधील (Palghar) तांदुळवाडी येथे रेती चोरणाऱ्या (Sand robbery) पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी रात्री एकच्या सुमारास प्रभारी पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली (Five culprit arrested) उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, सहा पोलिस निरीक्षक संदीप कहाळे आणि पथकाने तांदुळवाडी येथे छापा टाकला असता, रेतीमाफिया विनापरवाना रेती ट्रकमध्ये भरून चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा: सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती देशात मुंबईमध्ये जास्त; कुबेरनगरीचे स्थान कायम
पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेऊन ट्रक, रेती वाहतूक करणारी बोट, रेती, सक्शन पंप असा एकूण ४१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..