woman strike
woman strikesakal media

रायगड : महिलांची प्रांताधिकारी कार्यालयावर धडक; पाणी प्रश्नासाठी आक्रोश मोर्चा

Published on

पेण : अनेक वर्षांपासून पेण (Pen) तालुक्यातील खारेपाट विभाग पिण्याच्या पाण्यापासून (Drinking water) वंचित आहे. यामुळे बुधवारी (ता.२) संतप्त महिलांनी आक्रोश मोर्चा (Strike) काढला. त्यानंतर या महिलांनी ठिय्या आंदोलन केले. खारेपाट विभागात आठवड्यातून एकदा पाणी येते. काही ठिकाणी तीन दिवसांतून पाणी येते. हे पाणीही गढूळ असते. त्यामुळे महिला संतप्त झाल्या असून पाणी प्रश्न तातडीने (water supply problem) सोडवावा यासाठी मोर्चाद्वारे आक्रोश केला. प्रांताधिकारी कार्यालयावर (Divisional office) ठिय्या आंदोलन केले. पेण मूलभूत संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

woman strike
मुलांच्या लसीकरणात वसई-विरार पालिका सरस; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

खारेपाटाच्या पाण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकारची दिशाभूल होत आहे. या योजनेसाठी निधी मंजूर आहे, असे सांगण्यात येते; तर कधी तरी बदलला आहे, पावसाळ्याआधी पाणीपुरवठा होईल, अशी कारणे सांगण्यात येतात. गेल्या २० ते २२ वर्षांपासून खारेपाट विभागातील नागरिक त्यामुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला आश्वासन नको, तर कृती हवी, ही भूमिका घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या. सरकारने खारेपाटाला लवकरात लवकर प्रलंबित पाणीपुरवठा सुरळीत करावा, महिलांच्या डोक्यावरचा हंडा तत्काळ उतरवावा, असे यावेळी मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी सांगितले.

आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, वाशी सरपंच गोरख पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील, बंड्याशेठ पाटील, राजन झेमसे, आकाश म्हात्रे, संदीप पाटील, देवेंद्र कोळी यांच्यासह विकास संकल्प समिती, ठाकूर बेडी महिला बचत गट, वढाव पंचक्रोशी महिला बचत गट, कासू नवेघर महिला गट, बहुजन वंचित महिला आघाडी आदींच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com