
विक्रमगड : परदेशी पाहुण्यांसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थी रमले
विक्रमगड : ना भाषेची अडचण, ना कसला अनोळखीपणा... अगदी उत्साहाच्या वातावरणात विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील बोरसेपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील (zp school) आदिवासी विद्यार्थ्यांनी परदेशातून आलेल्या पाहुण्यांसोबत (foreigners) दोन दिवस घालवले. निमित्त होते विविध कलागुणांच्या विकासासाठी आयोजित कार्यशाळेचे. विद्यार्थ्यांसोबत अलेक्झांडर मोझेर (जर्मनी), इनीस रुंबा (लाटव्हिया, युरोप) या परदेशी पाहुण्यांनीदेखील दोनदिवसीय कार्यशाळेचा (workshop) आनंद लुटला. या कार्यशाळेत चित्रकला, ग्रामीण भागातील नृत्य, संगीत, मुखवटे बनवणे, मुखवटे रंगवणे, गोष्टी वाचन, बादलीत चेंडू टाकणे अशा उपक्रमांचा समावेश होता.
हेही वाचा: मुंबई : मेट्रो स्थानकाच्या नावांत बदल; शिंपोलीचा राजपत्रात उल्लेख
विद्यार्थ्यांनी निसर्गावरील गाण्यांचे तसेच नृत्य सादरीकरण करून परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. या अनोख्या स्वागताने पाहुणेदेखील भारावले. परदेशी पाहुण्यांनी बोरसेपाडा (वसुरी), घाटाळपाडा (देहर्जे) या दोन शाळांना भेटी दिल्या. सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या ईशा नाईक (मुंबई) यांच्या सहकार्याने ही भेट घडून आली.
परदेशी पाहुण्यांनी बोरसेपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके, हार्मोनियम, शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप तर घाटाळपाडा जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप केला. परदेशी पाहुण्यांना शाळेला भेट देण्यामध्ये धीरज दळवी आणि पल्लवी बोरसे यांनी विशेष सहकार्य केले; तर बोरसेपाडा (वसुरी)चे शिक्षक कमळाकर बिरारी, घाटाळपाडा (देहर्जे) येथील शिक्षक प्रकाश बोरसे, शाळेचे शिक्षक व गावातील विद्यार्थ्यांचे पालक शाळेतील कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा बोरसेपाडा येथे कार्यशाळेला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थीदेखील त्यांच्यासोबत रमले होते.
- कमळाकर दत्तू बिरारी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, बोरसेपाडा
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..