ST bus
ST busFile Photo

मोठी बातमी! बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटीत पुन्हा सेवेची संधी

मुंबई, ता. ६ : राज्य सरकारने एसटी विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच वेळी एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याची संधी राज्य सरकारने दिली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना १० मार्चपर्यंत हजर होण्याची संधी दिली. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अपील केल्यास त्यावर सुनावणी घेऊन त्यांना पुन्हा एसटीच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. (ST employees strike latest news)

ST bus
मुंबई : हवामान बदलामुळे सोमवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

४ मार्च रोजी अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला. त्यानुसार समितीने विलीनीकरणास नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपादरम्यान कारवाई झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. कारवाई मागे घेऊन कर्मचाऱ्यांना एसटीच्या सेवेत सामावून घेण्यासाठी पुन्हा एकदा १० मार्चपर्यंत संपकऱ्यांना कामावर हजर होण्याची मुदत देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय बडतर्फ कर्मचाऱ्यांचा आहे. नोकरी गमावलेल्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. मात्र, त्यासाठी बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्वरित अपील करायची आहे. अशा कर्मचाऱ्यांची तातडीने सुनावणी घेऊन त्यांना कामावर रुजू केले जाणार आहे.

ST bus
ठाणे : झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू

संपातील एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान न करता त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एक संधी देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com