Nawab Malik
Nawab Maliksakal media

‘नवाब मलिक हटाव... मुंबई बचाव...’; राजीनाम्यासाठी भाजपचा बुधवारी मोर्चा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे (mva government) मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी (Resignation demand) येत्या बुधवारी (ता. ९) भारतीय जनता पक्षातर्फे (bjp) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा (strike in mumbai) काढण्यात येणार आहे.

Nawab Malik
BMC सभागृहात भाजप नगरसेवकांनी घातला गोंधळ

गुन्हेगारांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे, तरीही त्यांनी राजीनामा न दिल्याने हा मोर्चा काढला जाईल. ‘नवाब मलिक हटाव... मुंबई बचाव...’ अशी घोषणा देत हा मोर्चा निघेल. भायखळा परिसरातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल. दुपारी बारा वाजता या मोर्चाची सुरुवात होईल, असे मुंबई भाजप कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com