Vaccination Center
Vaccination Centersakal media

नागरिकांची लसीकरणाकडे पाठ; मुंबईतील ५७ केंद्रे बंद

मुंबई : कोरोनाचा जोर उतरू लागल्याने (corona infection) नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवली आहे. परिणामी पालिकेने (bmc) आतापर्यंत ५७ लसीकरण केंद्रे (corona vaccination center) बंद केली आहेत. प्रभाग स्तरावर हॉल, समाजकल्याण केंद्रे, शाळा इत्यादी ठिकाणी सुरू असलेली केंद्रे आता बंद करण्यात आली आहेत. मुंबईकरांचे वेळेवर लसीकरण व्हावे म्हणून पालिकेने प्रत्येक प्रभागात एक ते दोन लसीकरण केंद्रे सुरू केली होती.

Vaccination Center
पनवेल : नऊवारी नेसून हिरकणींनी शिवगर्जना देत केला कर्नाळा किल्‍ला सर

परिसरातील समाजकल्याण केंद्रे, विवाह सभागृह, पालिका शाळा आदी ठिकाणी ती सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला तिथे लसीकरणासाठी लाभार्थींच्या रांगा लागल्या. आता मात्र ती ओस पडू लागली आहेत. दररोज केवळ ५० ते ६० लाभार्थी लसीकरणासाठी येत आहेत. कमी प्रतिसादामुळे पालिकेने अशी केंद्रे हळूहळू बंद करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेकडे गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत २९६ लसीकरण केंद्रे होती. जी आता ५ मार्चपर्यंत २३९ वर आली आहेत. आतापर्यंत ५७ केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

सध्या २३९ केंद्रांमध्ये दररोज ५० हजारांहून अधिक लाभार्थींच्या लसीकरणाची क्षमता आहे; मात्र निम्मे लाभार्थीही लसीकरणासाठी येत नाहीत. २३९ केंद्रांवर दररोज सरासरी २० ते २१ हजार जणांना डोस दिले जात आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या केंद्रांत क्षमतेच्या दुप्पट लसीकरण करण्यात आले.

पहिल्या डोसचा आलेख घटला

पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मुंबईतील १०० टक्के लाभार्थींना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य पालिकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच पूर्ण केले आहे. सध्या दोन ते तीन हजार लाभार्थी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी केंद्रावर येत असून त्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांची संख्या जास्त आहे. १५ ते १७ वयोगटातील तीन लाखांहून अधिक किशोरवयीन मुलांनी पहिला आणि दोन लाख जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ६२ लाख जणांनी पहिला डोस आणि ५३ लाखांहून अधिक लाभार्थींनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com