ठाण्यात रंगणार छायाचित्र प्रदर्शन

ठाण्यात रंगणार छायाचित्र प्रदर्शन

Published on

ठाणे, ता. ३० (बातमीदार) : ठाणे शहरातील वाईल्ड व्हीजन या संस्थेच्या वतीने वाईल्डलाईफ छायाचित्र प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील घंटाळी मैदानामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून यात २०६ उत्कृष्ट छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

३१ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान हे छायाचित्र प्रदर्शन रंगणार आहे. यंदा या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष आहे. कोरोनाआधी झालेल्या प्रदर्शनात सात ते आठ हजार वन्यजीवप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. यंदा घंटाळी मंदिर मैदानात होणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनात ८५ वन्यजीव छायाचित्रकार या प्रदर्शनामध्ये आपले छायाचित्र प्रदर्शित करणार आहेत. यात त्यांची २०६ छायाचित्रे निवडण्यात आली आहेत. प्रदर्शनातील छायाचित्र निवडीसाठी केदार भट आणि सागर गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले आहे. जास्तीत जास्त वन्यजीवप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक निनाद कर्णिक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com