नवी मुंबई : कळंबोलीत ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

Accident
Accidentsakal media
Published on

नवी मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत (truck accident) एका सायकलस्वाराचा मृत्यू (Person death) झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री कळंबोलीत घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकचालकाचा कळंबोली पोलिसांनी (Kalamboli police) शोध घेऊन ताब्यात घेतले. अपघातातील मृत सायकलस्वाराची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Accident
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांचा बळी ?

सायकलस्वाराचे वय अंदाजे २५ वर्षे असून मंगळवारी रात्री तो कळंबोली सेक्टर-१४ मधून जात होता. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्‍थळावरून पळ काढला.

या ठिकाणाहून जाणाऱ्या भारत अंकुशकर या बांधकाम व्यावसायिकाने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी भारत यांच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेऊन त्याला पकडले. ट्रक चालकाचे नाव दत्तु विठोबा कचरे (३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com