FIR on Police Inspector
FIR on Police Inspectorsakal media

शहापूर : पोलीस निरीक्षक राजाराम क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल

शहापूर : पंधरा दिवसांपूर्वी चिमुकलीसह बापाने आसनगाव (Asangaon suicide case) येथील राहत्या घरी केलेल्या आत्महत्येप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजाराम क्षीरसागर (PI Rajaram Kshirsagar) यांच्यावर गुन्हा दाखल (Police FIR Filed) करण्यात आला आहे. मृताच्या बहिणीने याबाबत तक्रार केल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका क्षीरसागर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

FIR on Police Inspector
मुंबई : रेल्वेलगतच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करा; खासदारांनी उठवला दिल्लीत आवाज

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला नसताना आईला व स्वतःला जेलमध्ये जावे लागल्याने निराश झालेल्या आसनगाव येथील विकास केदारे याने आपली अकरा वर्षांची मुलगी आर्या हिच्यासह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. मरणापूर्वी केदारे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे; पण आता सहन होत नाही.

मी बरबाद झालोय. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली असल्याचे तसेच शहापूर पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी क्षीरसागर पैशांची मागणी करीत असल्याबाबत बोट ठेवले होते. याबाबत क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत केदारे यांच्या नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार केदारे यांची बहीण शिल्पा शिरसाट यांनी क्षीरसागर यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com