आर्थिक नियोजनसाठी सकाळ मनी मासिक उपयुक्त ठरेल

आर्थिक नियोजनसाठी सकाळ मनी मासिक उपयुक्त ठरेल

आर्थिक नियोजनासाठी ‘सकाळ मनी’ मार्गदर्शक!
सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अर्थविषयक मासिकाचे प्रकाशन

प्रभादेवी, ता.२ (बातमीदार) : दिवसागणिक वाढत चाललेल्या महागाईमुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. अशा वेळी योग्य आर्थिक नियोजन केल्यास खर्च आटोक्यात येऊ शकेल आणि त्यासाठी ‘सकाळ मनी’ मासिक प्रत्येक कुटुंबाला उपयुक्त अन् मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास लोकशांती सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी व्यक्त केला. मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. १) आर्थिक गुंतवणुकीचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आलेल्या ‘सकाळ मनी’ मासिकाचा प्रकाशन सोहळा लोअर परळ येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
बँका, पतपेढी आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते. आर्थिक साक्षरतेसाठी ‘सकाळ मनी’चा अंक मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कानसा खोरे सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील, सह्याद्री सोसायटीचे अध्यक्ष राजाराम लाड, गडहिंग्लज तालुका सोसायटीचे खजिनदार रवींद्र कोकितकर, लोकशांती सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील, चक्रधर सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव ढाके, आकांक्षा सोसायटीचे अध्यक्ष रमेश पाटील, मुंबै बँकेचे उत्तम गुरव, मंगलमूर्ती सोसायटीचे अध्यक्ष कृष्णदेव कणसे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, वैश्य बँकेचे संचालक प्रकाश साडविलकर, भाग्योदय सोसायटीचे सचिव लक्ष्मण पाटील, शिवशाहू प्रतिष्ठानचे सचिव कृष्णा पाटील, नामश्री सेवा संस्थेच्या संचालिका वैष्णवी पाटील, लोकशांती सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक तेजश्री नाईक, लोकशांती सोसायटीचे महाव्यवस्थापक शीतल कारंडे आदी सहकार व पतपेढी क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ‘सकाळ मनी’चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व पतपेढ्यांच्या संचालकांना एकत्र आणण्याचे काम बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी केले.
पैशांचा योग्य वापर कसा करावा, गुंतवणूक कशी करावी, आर्थिक प्रगतीसाठी तिचा कसा उपयोग होईल, इत्यादी प्रश्न अनेकांना पडतात. ‘सकाळ मनी’ अंकाच्या माध्यमातून साध्या-सोप्या भाषेत त्याची उत्तरे मिळतील, असे विलास पाटील यांनी सांगितले.
आर्थिक गुंतवणुकीवर आधारित अनेक मासिके इंग्रजी भाषेत आली. मात्र, ‘सकाळ’ने प्रथमच सोप्या आणि सुलभ शब्दांत मराठीतील पहिला आर्थिक विषयाला वाहिलेला अंक प्रकाशित केला याचे कौतुक आहे. त्याचा सर्वांना नक्कीच फायदा होईल, असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर यांनी सांगितले.
रवी चिले, दीपक आंग्रे, संजय सातार्डेकर, प्रकाश गिलबिले, प्रकाश कानडे, सुशांत वेंगुर्लेकर, श्रीपती पोवार, सुरेश डावरे, पांडुरंग चौगुले, किशोर गोंदुकुपे, विठ्ठल पाटील, धनंजय कसलकर, विष्णू टेंभुगडे, प्रकाश केसरकर, विनोद शेट्टे, शिवाजी चव्हाण आणि अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच बँकिंग क्षेत्रातील मान्यवरही सोहळ्यास उपस्थित होते.

गुंतवणुकीविषयी नवी दिशा!
मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या मागे पडतो, कारण त्याला पैशांचे नियोजन कसे करावे ते कळत नाही. अनेक वेळा बाजारात येणाऱ्या गुंतवणुकीच्या विविध योजनांमधूनही त्याची फसगत होते. मात्र, ‘सकाळ मनी’ अंकातून वाचकांना गुंतवणुकीविषयी एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com