crime news
crime newsSakal media

ड्रग्ज तस्करांना धारावीतून अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची धडक कारवाई

धारावी : गेल्या वर्षभरात मुंबईत महिला, मुलांचा वापर करून अमली पदार्थांच्या तस्करीचे (Drug peddlers) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुन्हा घडल्यानंतर हे तस्कर फरार होत असतात. अशाच काही गुन्ह्यातील फरारी चार आरोपींना (Four culprits arrested) मुंबई क्राईम ब्रँच (Mumbai crime branch) युनिट-६ च्या पथकाने धारावीतून अटक केली आहे.

crime news
अलिबाग : वार्षिक आराखडा निधीचा शंभरटक्के विनियोग

आरिफ शेख, अब्दुल शेख, इक्बाल शेख आणि फिरोज नूर मोहम्मद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत; तर आझाद नसीर शेख याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या आरोपींच्या झडतीदरम्यान त्यांच्याकडून सुमारे २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

त्याची किंमत सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे. या सर्व आरोपींना एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. फरारी आरोपी या टोळीचा म्होरक्या असून, मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com