वसई : २६ हजार वाहनचालकांना एक कोटी ४० लाखांचा दंड | Vasai News update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police
२६ हजार वाहनचालकांना एक कोटी ४० लाखांचा दंड

वसई : २६ हजार वाहनचालकांना एक कोटी ४० लाखांचा दंड

वसई : वसई-विरार (vasai-virar) शहरात नियमांचे उल्लंघन (Traffic rule breaking) करणाऱ्या वाहनचालकांची धरपकड केली जात आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत एकूण २६ हजार १७२ जणांवर कारवाई करत १ कोटी ४० लाखांचा दंड (one crore forty lac fine) आकारण्यात आला. यापैकी ९० लाख रुपयांची वसुलीदेखील वाहतूक पोलिसांनी केली आहे. वसईत-विरार शहरात वाहनांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. वाहतूक मार्गदेखील तोकडे पडत असून (Traffic jam issue) वर्दळीमुळे कोंडीत भर पडत आहे.

हेही वाचा: अलिबाग : वार्षिक आराखडा निधीचा शंभरटक्के विनियोग

त्यात वाहतूक पोलिसांसमोर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आव्हान आहे. म्हणूनच विनालायसन्स, कागदपत्रांविना वाहन चालविणे, भरधाव वेग, सिग्नल मोडणे यासह वाहतुकीसंबंधी नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांची वसई-विरार शहरात कसून तपासणी केली जात आहे. मुख्य मार्गावर पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असून दुचाकी, चारचाकी, रिक्षा-टॅक्सी, अवजड वाहने, टँकर, टेम्पो, मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी वाहतूक वाहने, खासगी बस अशा वाहनांवर कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे.

गेल्या तीन महिन्यात शहरात १३ हजार १०६ दुचाकी व ४ हजार ३८९ रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला; तर दोन हजार ६१७ टेम्पो, खासगी व शालेय ७६ वाहने, अवजड ५७; तर १३२ टुरिस्ट वाहनांवर नियमभंग केल्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यातून एक कोटी ४० लाखांचा दंड ठोठावला असून, ९० लाख रुपयांची वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यानची कारवाई

वाहने पावतीद्वारे दंड
१८,९०५ ९०,०४,३००
वाहने ऑनलाईन दंड
७,२६७ ५०,९०,४००
एकूण ०१,४०,९४,७००

तीन महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक कोटी ४० लाखांची दंड आकारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी करून वाहने चालवावीत. ऑनलाईन दंड ज्यांनी भरला नाही ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेही असली, तरी ऑनलाईन दंड भरू शकते. त्यामुळे दंडाची रक्कम लवकरात लवकर भरणा करावी.
- डी. एम. करांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :traffic Policevasai virar