strike
strike Sakal media

पालघरमधील महसूल विभागाचा कारभार ठप्प; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका

पालघर : पालघर (Palghar) जिल्हा महसूल विभागातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. तसेच महसूल सहायकाची रिक्त पदे आहेत. ती भरण्यात यावीत, या मागण्यांसाठी महसूल विभागाचे (Revenue department strike) राज्यभर आंदोलन सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील १८२ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल कार्यालयातील (official work stopped) संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.

strike
कल्याणमधील मुस्लिमांमध्ये नाराजी; मनसेविषयी येत्या दोन दिवसांत घेणार निर्णय

पालघर जिल्हा कार्यालयासह पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, वसई येथील महसूल उपविभागीय कार्यालयातील तसेच आठ तालुक्यांतील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व मंडल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. कोकण विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार यांचे प्रस्ताव गेल्या दीड-दोन वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित आहेत.

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांबाबत लिहिलेल्या पत्रात अव्वल कारकून मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती देण्याची प्रक्रिया कायम ठेवावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांची पदोन्नती नायब तहसीलदार संवर्गातील झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या विभागातच पदस्थापना देण्यात यावी. सरळसेवेने नायब तहसीलदार पदावर निर्मितीचा कोटा २० टक्के असून त्यानुसार विभाग व जिल्हानिहाय कोटा ठरवून द्यावा, अशी मागणी यापूर्वी राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती.

आमच्या मागण्यांसाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने केली; मात्र सरकारने आमची दखल घेतली नाही. त्यामुळे नाइलाजाने बेमुदत संपावर जावे लागले. सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात.
- भूपेश नेरूरकर, महसूल कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com