water scarcity
water scarcitysakal media

शहापूर : माळ ग्रामपंचायतमधील वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची झळ

खर्डी : शहापूर (shahapur) तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे माळ ग्रामपंचायत हद्दीतील (Maal Gram panchayat) वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. माळ ग्रामपंचायत अंतर्गत शिदवाडा, काटीचापाडा, वारघडवाडी, तोरणपाडा, आंब्यावाडी, पाटीलवाडी व माळ या वाड्या आहेत. येथील लोकसंख्या (Population) दोन हजारांच्या आसपास आहे.

water scarcity
रायगड : मुंबई-काशीद जलवाहतूक डिसेंबरपासून; व्यवसायाला नवे पंख देणारा प्रकल्प

उन्हाळ्यात येथे कायम पाणीटंचाई जाणवत असल्याने येथील रहिवाशांना मध्य-वैतरणा धरणाच्या जलस्त्रोतातून पाणी आणावे लागत आहे. माळ ग्रामपंयात कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेने एक जलकुंभ बांधला आहे. या जलकुंभातून पाणीपुरवठा योजना राबवली तर येथील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता आहे. या जलकुंभाखाली छोटा बंधारा असून त्याची उंची वाढविल्यास भरपूर पाणीसाठा येथे उपलब्ध होऊ शकतो.

जळकुंभाचे नव्याने आरसीसी बांधकाम करून यावरून माळ पाठरावरील आदिवासी
वाड्यांसाठी पाणीपुरवठा करता येऊ शकतो. तशा प्रकारचा सर्व्हे करून अंदाजपत्रक देखील बनविले आहे; परंतु भावली पाणीपुरवठा योजनेमुळे शहापूर तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा योजना रखडल्या असून त्यांना जिल्हा परिषदेमार्फत मंजुरी मिळत नाही. जिल्हा परिषदेने मंजुरी दिल्यास नक्कीच या ठिकाणी पाणीपुरवठा योजना करणे शक्य आहे.

- विकास जाधव, उपभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, शहापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com