भांडुप परिसराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुप परिसराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा
भांडुप परिसराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा

भांडुप परिसराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा

sakal_logo
By

भांडुप, ता. ७ (बातमीदार ) ः काही दिवसांपासून भांडुप परिसराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा पडलेला पाहायला मिळतो आहे. लोकप्रतिनिधींसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे होर्डिंग, तसेच नवीन शोरूम दुकानदारांनी शुभारंभाचे होर्डिंग्ग लावले आहेत. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले असून होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय पक्ष, संघटना, पदाधिकाऱ्यांच्या निवडी, तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी केली जात आहे. तसेच प्रत्येक चौकामध्ये सिग्नल किंवा लाईटच्या खांबांवर होर्डिंग पाहायला मिळत आहेत. स्टेशन रोड परिसर, व्हिलेज रोड, सोनापूर सिग्नल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज तलाव अशा ठिकाणी होर्डिंग्ग मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही नाराजीचा सूर असून महापालिकेने अनधिकृत होर्डिंग काढावी, अशी मागणी होत आहे.

...
परिसरातील होर्डिंग हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच होर्डिंग हटवण्यात येतील.
- पंकज पवार, निरीक्षक, एस. वार्ड, भांडुप.
...

काही ठिकाणी होर्डिंग पडल्याने अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा होर्डिंग काढणे गरजेचे आहे.
- गणेश धनावडे, नागरिक.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..