नॉलेज पार्क रस्ता अंधारात
वाशी, ता. ७ (बातमीदार) : ऐरोली नॉलेज पार्क येथील पथदिवे गेल्या आठवड्यापासून बंद आहेत. यामुळे वाहनचालकांना रात्री प्रवास करताना कसरत करावी लागते.
ऐरोली येथील पटनी कंपनीचा रस्ता म्हणून ओळख असणाऱ्या ऐरोली नॉलेज पार्क मार्गाची तीन वर्षांपूर्वी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले होते. अखेर पालिकेने ५८ कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकरण केले. त्यानंतर पथदिवे बसवण्यात आले. मागील आठवड्यापासून हे पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रात्री प्रवास करताना कसरत करावी लागते. ऐरोली पुलावरून थेट ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील पटनी कंपनीच्या रस्त्यामार्गे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, भिवंडी असा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते, परंतु या मार्गावर अंधार असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.
ऐरोली नॉलेज पार्क रस्ता येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे करण्यात येत आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.