मनसे-राष्ट्रवादी
मनसे-राष्ट्रवादीSakal

मनसे कार्यालय हल्ल्याशी राष्ट्रवादीचा सबंध नाही : आनंद परांजपे

मुंब्रा पोलिसांनाकडून आरोपींना तत्काळ अटक

ठाणे : मुंब्रा येथे मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी हा पक्ष संविधानावर निष्ठा असणारा आहे. आम्ही समाजविघातक कृत्य करीत नाही, तसेच अटक असलेले तिन्ही आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. मुंब्रा येथे मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. ही दगडफेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत आनंद परांजपे यांनी स्पष्टीकरण दिले.

परांजपे म्हणाले की, मनसे कार्यालयाबाहेर सहा सीसी टीव्ही कॅमेरे राष्ट्रवादी काँग्रेसनेच बसविले आहेत. कोणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह कृत्य करेल आणि त्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येतील, असे आम्हाला अपेक्षित होते. या सीसी टीव्हीचा डीव्हीआर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रफिक शेख यांच्या घरामध्ये आहे. दगडफेक झाली, त्यानंतर राष्ट्रवादीनेच व्हिडीओ फुटेज तत्काळ मुंब्रा पोलिसांना दिले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com