MlA Ramesh Patil
MlA Ramesh Patilsakal media

"मच्छीमारांच्या डिझेलबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करू"

मुंबादेवी : देशातील मच्छीमारांना (Fisherman) वाढीव दराने पेट्रोलियम पदार्थ (Petroliam objects) मिळत असल्यामुळे ते दर कमी व्हावेत यासाठी दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep singh puri) यांची महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील (Ramesh Patil) यांच्या नेतृत्वात गोपाल शेट्टी, किरण कोळी, चेतन पाटील यांनी भेट घेतली. निर्माण भवन कार्यालयात ७ एप्रिलला ही भेट झाली, तेव्हा अर्थमंत्र्यांची (Finance Minister) चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

MlA Ramesh Patil
एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी

या प्रसंगी तेथे उपस्थितीत अधिकाऱ्यांनी गुजरात व महाराष्ट्रात डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर परत मिळत असल्यामुळे फक्त एक दोन रुपयांचा फरक राहिला आहे व इतर सागरी राज्यांचा प्रश्न नाही, अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु आमदार रमेश पाटील व किरण कोळी यांनी आक्षेप घेत सांगितले की, मूल्यवर्धित कर परतावा हा राज्यांचा विषय आहे.

किरकोळ व घाऊक विक्रेत्यामध्ये प्रतिलिटर २५ ते ३० रुपये फरक आहे. तो कमी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, केंद्रीय अर्थमंत्री यांच्या कार्यालयात प्रस्ताव दिला आहे, लवकरच मच्छीमारांना पेट्रोलियम पदार्थांवरील वाढीव दराबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले.


मस्त्यव्यवसाय मंत्र्यांची भेट

शिष्टमंडळाने केंद्रीय मस्त्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचीही दिल्लीत निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी सांगितले की, हा प्रश्न पंतप्रधानांपर्यंत नेला आहे, दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत प्रत्यक्ष भेटणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com