
अंबरनाथला ३० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या, एक फरार
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील सावरा गावात गोवा येथून आणलेला ३० लाखांचा विदेशी मद्यसाठा (Foreign liquor seized) राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने (State excise department) जप्त केला आहे. आयुक्त के. बी. उमाप, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य संचालक उषा वर्मा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. विदेश मद्यसाठ्याप्रकरणी अविनाश केवणे, समीर केवणे (culprits arrested) यांना अटक केली असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील (पूर्ण नाव समजू शकले नाही) फरार आहे.
हेही वाचा: ठाणेकरांवर पाणीबाणीचे संकट; पुन्हा ऐन उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार
सावरागावमधील मराठे (केवणे) फार्म हाऊसवर गोव्याच्या मद्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाचे विभागीय निरीक्षक आनंदा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फार्म हाऊसवर छापा घालून विदेशी मद्याचा साठा जप्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..