Vasai School Bus
Vasai School BusSakal Digital

वसईत बसमधून जीवघेणा प्रवास

वसई, ता. १२ (बातमीदार) ः खासगी वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसावेत, वाहनाच्या दारात उभे राहून प्रवास करू नये आदी नियम आरटीओकडून वारंवार खासगी वाहनचालकांना सांगितले जातात; मात्र याच आरटीओ विभागाचे वसई-विरार पालिकेच्या बसकडे दुर्लक्ष होत आहे. कारण या बसमधून प्रवासी लटकून प्रवास करत आहेत. या प्रवाशांकडे आरटीओसोबत बसचे वाहन चालक-वाहक यांचेही लक्ष नसते. त्यामुळे हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

खासगी वाहनांतून विद्यार्थी क्षमतेपेक्षा अधिक नेले जातात. शाळेची दप्तरेदेखील बाहेर असतात; तर अन्य वाहनांतदेखील अशीच परिस्थिती अनेकदा दिसून येत आहे. अशातच दुचाकीवर तर अक्षरशः तीन ते चार जण मार्गावरून सुसाट प्रवास करतात. वाहतूक विभाग, परिवहन विभाग याकडे डोळेझाक करत आहे. पालिकेच्या बसमध्येदेखील स्थिती बिकट झाली आहे. यातूनही विद्यार्थ्यांना लटकूनच प्रवास करावा लागतो आहे.
विरार महापालिकेने २०१२ मध्ये परिवहन सेवा सुरू केली. परिवहन सेवेचे तिकीट कमी असल्याने मुंबई, ठाणे, वसई विरार व पालघरमधील चाकरमानी रेल्वेने उतरल्यावर औद्योगिक वसाहतीतील जाण्याकरिता या बसचा वापर करतात. त्याचबरोबर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. बसने प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिक, डायलेसिस रुग्ण, दिव्यांग बांधव, विद्यार्थ्यांना सवलतदेखील दिली जाते, परंतु हाच प्रवास धोकादायक होत आहे. विद्यार्थी, तरुण बसच्या दरवाजावर लटकताना दिसून येतात. त्यामुळे बसच्या शेजारून जाणाऱ्या अवजड किंवा अन्य वाहनांचा धक्का लागला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिवहन सेवेच्या बसमध्ये लटकून प्रवासी प्रवास करत असतील तर संबंधित ठेकेदार,चालकांना सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षेची दखल घेतली जाईल. प्रवाशांनी दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करून त्यामुळे दुर्घटना होऊ शकते.
डॉ. किशोर गवस, उपायुक्त, परिवहन विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com