Vasai-Virar Municipality Corporation
Vasai-Virar Municipality Corporation sakal

वसई-विरार पालिकेकडून मिळणार खेळाडूंना बक्षिस

वसई-विरार पालिकेतर्फे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे दिली जातात

विरार : वसई-विरार महापालिका हद्दीतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या पालिका हद्दीतील खेळाडूंना पालिका रोख बक्षीस देत होती; परंतु गेल्या दोन वर्षांपासून पालिकेत प्रशासक राज असल्याने खेळाडूंना बक्षिसांचे वाटप करण्यात आले नव्हते. या विषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करत या प्रश्नाला वाचा फोडली होती. या वृत्तानंतर पालिकेने खेळाडूंना पुन्हा बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका हद्दीतील ७२ खेळाडूंना बक्षिसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेगवेगळ्या खेळातील या खेळाडूंना २२ लाख ३५ हजार रुपयांची बक्षिसे देण्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

वसई-विरार पालिकेतर्फे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे दिली जातात. यात ५ हजारपासून ४ लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांचा समावेश आहे. खेळाडूंना तातडीने बक्षिसांची रक्कम देण्याची मागणी माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्याकडे केली केली होती.

७२ खेळाडूंची प्रतीक्षा संपली
पालिकेवर प्रशासक राज आल्यामुळे जवळपास ११९ खेळाडूंची लाखो रुपयांची बक्षिसे अडकली होती. यामध्ये राज्यस्तरीय ४१ खेळाडू, राष्ट्रीयस्तरावरील ६६ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १२ खेळाडूंचा समावेश होता. यापैकी ७२ जणांच्या प्रस्तावाला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून उर्वरित खेळाडूंच्या बक्षिचांचा प्रश्न ही या आठवड्यात निकाली निघेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com