खाकी वर्दीतले कवीमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाकी वर्दीतले कवीमन
खाकी वर्दीतले कवीमन

खाकी वर्दीतले कवीमन

खाकी वर्दीतले कविमन

- रोहिणी लाटे, शिपाई, ठाणे शहर पोलिस

खाकी वर्दीतल्या पोलिसाला कळते ते केवळ कर्तव्य... भावभावना, संवेदना सारे काही विसरून बजावायचे असते ते कर्तव्य...अशा वेळी अनेक प्रसंग असे असतात, की ते विसरता तर येतच नाहीत, पण मनाच्या कोंदणात ते साठवूनही ठेवता येत नाहीत. अशा वेळी कुठे तरी व्यक्त होऊन त्यांना मोकळी वाट करून द्यावीशी वाटते. ठाणे पोलिस दलातील रोहिणी लाटे यांनी त्यासाठी कवितेचा मार्ग स्वीकारला आहे. ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षामध्ये शिपाई असलेल्या रोहिणी आज खाकी वर्दीतल्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.
रोहिणी लाटे या मूळच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील आपटे या छोट्याशा खेडेगावातील. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या.

आई, बाबा, चार बहिणी, दोन भाऊ असा त्यांचा परिवार; त्यामुळे परिस्थिती बेताचीच. प्रतिकूल परिस्थितीतही गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण. पुढे किन्हवलीत इंग्रजी विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे पुढे शिक्षकी पेशा स्वीकारून आरामाची नोकरी सहज शक्य होती, पण रोहिणी यांनी पोलिसांत भरती होण्याचा निर्णय घेतला. रोहिणी यांचे पती दीपक नलावडे नवी मुंबई पोलिस दलात हवालदार आहेत. रोहिणी या गेली १० वर्षे ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत आहेत.

माझ्या फाटक्या संसारासोबत कारभारणीची साथ होती
पदरात दोन पोरी, हीच माझी संपत्ती होती
मी दिसभर मेहनत करी, ती कष्टाची भाकरी भाजत होती
परिस्थितीचे चटके नको म्हणून पोरींना शाळेत धाडत होती...

या कवितेतून त्यांनी त्या आजोबांची नव्हे, एकाकी जीवन जगणाऱ्या तमाम वद्धांची व्यथा मांडली. तेव्हापासून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना त्यांनी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण ठाणे पोलिसांत रोहिणी लाटे या उत्तम कविता करतात हे ठाऊक झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या स्पर्धेत रोहिणी यांना पारितोषकही मिळाले आहे. या कविता अजूनही पुस्तकरूपात आल्या नसल्या, तरी भविष्यात आपला एक कवितासंग्रह असावा असे त्यांचे स्वप्न आहे.

कविमन जपत पुढची झेप
कविता करणे हा छंद नाही, तर भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम आहे. त्यामुळे जेव्हा सुचते तेव्हा लगेच ते कागदावर उतरवून काढते. पती दीपक नलावडे यांची प्रत्येक पावलावर साथ आहेच, पण वरिष्ठांचीही जेव्हा दाद मिळते तेव्हा ते बक्षीसच असते. त्यामुळे हे कविमन जपत आता पुढची झेप घ्यायची आहे. त्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली असल्याचे रोहिणी लाटे यांनी सांगितले.

तू दिलेल्या वचनासोबत मीही वचन दिले होते,
लढण्यासाठी मनगटात बळ मीच दिले होते
वीरपत्नी हे नाव त्यामुळेच मला मिळाले होते
तरीही बाळाच्या कौतुकासाठी येशील मी याच आशेवर... कालही होते...

देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहूती देणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नीचे दुःख मांडणारी ‘वीरपत्नी’ ही कविता रोहिणी लाटे यांनी लिहिली आहे. एकीकडे जवानाची पत्नी असल्याचा अभिमान; तर दुसरीकडे पती शहीद झाल्यानंतरही व्यक्त न करता येणारे दुख... वीरपत्नींच्या मनाची हीच अवस्था रोहिणी यांनी कवितेतून मांडली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..