लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात

शहापूर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात लहान मुले व महिलांसह सुमारे २० वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तानसा-आटगाव या मार्गावरील सावरदेव येथील वळणावर दुपारी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने वधू एक दिवस आधीच बेंदवड येथे पोहचली असल्याने बचावली.
तालुक्यातील तानसा हद्दीतील आखाराचा पाडा येथील लग्नाचे वऱ्हाड एका टेम्पोमधून शहापूरजवळच असलेल्या बेंदवड येथे निघाले होते.

साखरपुडा व हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तानसा-आटगाव मार्गावर सावरदेव येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात लहान बालके व महिलांसह सुमारे २० वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ईश्वर सहारे (१९), अवंती भडांगे, (७०), सुलाबाई जाधव (४२), सरिता भवर (२२), गुलाब भोये (६०), बाळू भडांगे (५), मैना वाडू (६९), अभिषेक मुकणे (१९), अनिता चवर (३८), मीना गावित (५५), सीता भोये (६०), मंदा गावित (४५), संदेश पवार (१४), नेहा कोची (१५), अंजना महाले (३५), बाळू पवार (१८), सुरेश मेघे (१८), मंगल महाले (२२), लहू महाले (२६) यांचा समावेश असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शिवसेना माजी आमदारांची धाव

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तात्काळ घटनास्थळी शिवसेनेची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व अपघातग्रस्तांवर तात्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top