राजमळा येथे मटका जुगार अड्यावर छापा

राजमळा येथे मटका जुगार अड्यावर छापा

अलिबाग, ता. २५ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील राजमळा येथील एका चिकनच्या दुकानाच्या मागे मटका जुगार सुरू होता. अलिबाग पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी त्या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मटकाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अलिबाग तालुक्यातील मटका जुगार चालवणाऱ्यांना दणका बसला आहे.
अलिबाग शहरासह ग्रामीण भागात मटका जुगार धंदा तेजीत सुरू आहे. तरुणाईसह ४५ ते ५० वयोगटातील मंडळी या धंद्याच्या आहारी जाऊ लागली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पैशाची लूट होते. कुटुंब उद्‍ध्वस्त होण्याची भीतीही प्रचंड होऊ लागली आहे. तरीदेखील अलिबाग तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात मटका जुगार धंदा बेकायदेशीररित्या राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील राजमळा येथील भवानी मंदिराजवळील चिकन सेंटरच्या मागे नितेश सुरेंद्र पाटील (२४) ही व्यक्ती बेकायदा मटका जुगार चालवत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल सानप, पोलिस हवालदार झिराडकर, पोलिस नाईक हर्षल पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने खबऱ्यांकडून पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी सायंकाळी राजमळा येथे छापा टाकला. या छाप्यात वही, पेनसह हजारो रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com