एकवीरा यात्रेसाठी जादा गाड्या

एकवीरा यात्रेसाठी जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२० : कार्ला येथील आई एकवीरा यात्रेला २८ मार्च रोजी सुरुवात होत असून या यात्रेसाठी जाणाऱ्या आगरी कोळी बांधवांसह इतर भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी रायगड एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. रायगडमधील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
२८ मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस जरी असला तरी अनेक भाविक यात्रेच्या एक दोन दिवस अगोदरच कार्ला येथे यात्रेसाठी रवाना होत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने यात्रेच्या आदल्या दिवशीच म्हणजेच २७ मार्च रोजी आणि यात्रेच्या दोन दिवसानंतर म्हणजेच ३० मार्चपर्यंत जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि धोका पत्करून खासगी वाहनांचा वापर करू नये यासाठी एसटी महामंडळाने राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड परिवहन विभागातील अलिबाग, पेण, कर्जत, रोहा आणि मुरूड या पाच आगारातून या जादा गाड्या सोडण्यात येणार असून अलिबाग-कार्ला, पेण-कार्ला, मुरूड-कार्ला, रोहा-कार्ला, पनवेल-कार्ला या मार्गावर देखील प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेउन गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे यात्रेच्या ठिकाणी काही गाड्या वस्तीच्या ठेवल्या जाणार आहे. प्रवाशांची जशी गर्दी असेल त्याप्रमाणे त्या नंतर सोडण्यात येतील, अशी माहिती रायगड नियंत्रक विभाग प्रमुख दीपक घोडे यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com