नागेश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

नागेश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

अलिबाग, ता. ३० (बातमीदार) : रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांना रायगड प्रेस क्लबच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. २६) हा उपक्रम हाती घेण्यात आला. नागेश कुलकर्णी यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये अलिबाग प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. १९८० पासून आजपर्यंत गेली ४२ वर्षे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात सहचिटणीस, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष कार्यरत आहेत. गेली २२ वर्षे जिल्हा पत्रकार संघात उपाध्यक्षपद भूषवत आहेत. तर ४० वर्षे ग्रंथालय चळवळीत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. जीवनगौरव पुरस्काराने कुलकर्णी यांचा सन्मान केल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव केला. कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com