Water News:
Water News:sakal

Water News: अलिबाग तालुक्यात पाणी टंचाई; तात्पुरत्या स्वरूपात टॅंकरने पाणीपुरवठ्याच्या सूचना

अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, रांजणखार डावली, रेवस, बोडणी या समुद्रालगतच्या गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Alibag News: मार्च महिन्यातच अलिबाग तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. आतापर्यंत पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना राबवूनही तालुक्याच्या टोकाला असलेल्या वाड्‌या-वस्‍त्यांमध्ये पाणी पोहचत नाही आहे. (water Scarcity in Alibag)

तालुक्यातील मिळकतखार, रांजणखार डावली, रेवस, बोडणी या समुद्रालगतच्या गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Water News:
Water Crisis IPL : दुष्काळात IPL सुरू होतं अन् रूग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द होत होत्या... अखेर हाय कोर्टानं दिला होता दणका

परिसरात यापूर्वी अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना राबवण्यात आल्या होत्या, परंतु त्या दीर्घकाळ कार्यान्वित राहू शकल्या नाहीत. आताही जलजीवनमधून याठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर झाल्या आहेत.

मात्र, योजनांचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने तालुक्याचा टोकाचा भाग असलेला परिसर कायम टंचाईग्रस्त राहिला आहे. समुद्रालगत परिसर असल्याने येथे कुपनलिकांमधून खारट पाणी येते.(alibag News)

Water News:
Nashik Water Crisis : भूगर्भातील पाणीसाठा खालावला; शेततळीही पडू लागली कोरडी!

गोड्या पाण्याच्या विहिरींचा उपसा वाढल्याने विहिरींचाही तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीचे पाणी तिथपर्यंत पोहचत नसल्याने दरवर्षी पाणीटंचाई जाणवते.

या वर्षी तर डिसेंबर महिन्यापासूनच येथील महिलांच्या डोक्यावर हंडा आला आहे. जलजीवन योजनेत येथील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे; मात्र, या योजना अद्याप पूर्ण न झाल्याने येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.(water Scarcity news)

Water News:
Nashik Water Crisis : धरण उशाला कोरड घशाला! कादवा नदीपात्र कोरडे पडल्याने जलचर प्राण्यांचा मूत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com