खोपोली सय्यद गाझी बाबा उरुस

खोपोली सय्यद गाझी बाबा उरुस

खोपोली (बातमीदार) ः शहरात सय्यद गाझी बाबा उरुस मोठ्या उत्‍साहात सुरू आहे. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस सुरू असलेल्‍या उरसात खोपोली शहर व परिसरातील सर्व मुस्लिम बांधव दर्शन घेण्यासाठी व मानाची चादर चढविण्यासाठी येतात. उरसानिमित्त शीळफाटा येथून दर्गापर्यंत पालखी यात्रा काढण्यात येते. यात मुस्लिम बांधवसह सर्व धर्मीय नागरिक व सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी होतात.
उरसानिमित्त दोन दिवस मुंबई -पुणे जुना महामार्गावर संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सज्ज होते. या दरम्यान मोठ्या व जड वाहनांची वाहतूक चिंचवली डीपीमार्गे लौजी-वासरंग पुढे महामार्ग अशी वळवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com