सुवर्णमंदिराच्या धर्तीवर चवदार तळाचा विकास करणार  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुवर्णमंदिराच्या धर्तीवर चवदार तळाचा विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाड, ता. २० (बातमीदार) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी जो लढा दिला, तो ऐतिहासिक लढा होता. म्हणूनच चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून सुवर्णमंदिराच्या धर्तीवर चवदार तळे येथेही पाणी शुद्धीकरण यंत्रणा राबवली जाईल, तसेच चवदार तळे सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड येथे दिली.

चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (ता. १९) रोजी मार्चला रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्माज्योती गजभिये, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदे, महाड तहसीलदार सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सुवर्णमंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठीदेखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com