शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याची तयारी करत असताना कामगाराचा शॉक लागून मृत्यू

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याची तयारी करत असताना कामगाराचा शॉक लागून मृत्यू

महाड, ता. ३१ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर राजदरबार येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या सजावटीचे काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ३० मे रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या कामगाराचे नाव जमालुद्दीन ताऊहिन शेख ( वय ३८, मूळ राहणार बिहार व सध्या राहणार धारावी मुंबई) असे आहे. रायगड किल्ल्यावर सध्या साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या सजावटीचे, तसेच विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे. हे काम करत असताना ३० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास जमालुद्दीनला विजेचा शॉक लागल्याने तो जागीच खाली कोसळला. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अन्य व्यक्तींनी व कामगारांनी त्याला ताबडतोब गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणले असता जमालुद्दीनचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या कामगाराचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृतदेह ही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com