
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सुविधा
महाड, ता. १ (बातमीदार) : रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आलेल्या शिवप्रेमींसाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध केल्या असून त्यांची माहिती घेऊनच शिवप्रेमींनी गडावर दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाडकडून नातेखिंड मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता कोंझर व वाळसुरे येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुंबई, पुणे, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, तसेच पुणे- ताम्हाणी-निजामपूर मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता कवळीचा माळ व पाचाड बौध्दवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी पाणी, शौचालय, स्नानगृह, वैद्यकीय सुविधा तसेच पार्किंग गडाच्या पायथ्यापर्यंत ये-जा करण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे.
..........
शौचालय व स्नानगृह व्यवस्था
वाळसुरे पार्किंग पॉईंट, कोंझर एसटी पार्किंग पिकअप पॉईंट, कोंझर पार्किंग पॉईंट, पाचाड पोलिस चौकीसमोर, पाचाड धर्मशाळा, पाचाड पलिकडे पार्किंग कवळीचा माळ, चित्त दरवाजा, मदारमोर्चा, महादरवाजा, जिल्हा परिषद विश्रामगृहामागे, टकमक टोक रस्त्यावर, हत्ती तलाव, जगदीश्वर मंदिराच्या अलिकडे, जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला
............
भोजन व खानपान स्थळ-
पाचाड (धर्मशाळा)
रायगडावर
..........
वैद्यकीय पथकाची ठिकाणे (गड पायथा)
कोंझर पार्किंग
वाळसुरे पार्किंग
शिवसृष्टी पाचाड बौद्धवाडी पार्किंग
प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड
कवळीचा माळ पार्किंग
नाणे दरवाजा
....
वैद्यकीय पथकाची ठिकाणे (गड पायथा ते गड)
नाणे दरवाजा ते महादरवाजा
चित्त दरवाजा ते महादरवाजा
महादरवाजा ते शिरकाई माता मंदिर
चित्त दरवाजा
महादरवाजा
.....
वैद्यकीय पथकाची ठिकाणे (गडावर)
रोपवेजवळ गडावर, राजसदर, होळीचा माळ व जगदीश्वर मंदिर, रायगडाच्या पायथ्याशी अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असलेल्या चार व बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असलेल्या १६ रुग्णवाहिका