रायगड रोपवेला जोडली चौथी ट्रॉली

रायगड रोपवेला जोडली चौथी ट्रॉली

महाड, ता. १८ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर केवळ चारच मिनिटांत पोहोचण्याची सोय असलेल्या रायगड रोप-वेला आता चौथी ट्रॉली जोडली जाणार आहे. त्यामुळे गडावरून आता ४८ प्रवासी एकाचवेळी चढ-उतार करणार आहेत. या कामामुळे शिवप्रेंमीमध्ये, तसेच पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक हजार चारशे पायऱ्या व दमछाक करणारा मार्ग असून या रस्त्यावरून चालणे व गड सर करणे अनेकांना कठीण होत असते. त्यामुळे रायगडावर जाण्यासाठी १९९५-९६ मध्ये रोप-वेची सुविधा सुरू करण्यात आली. सुरुवातीला गडावर जाण्यासाठी दोन ट्रॉली व गड उतरण्यासाठी दोन ट्रॉली अशा चार ट्रॉलीत ये-जा करत असत. त्यानंतर मागील वर्षी यामध्ये एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली होती; परंतु आता गडावर जाण्यासाठी चार ट्रॉली व उतरण्यासाठी चार ट्रॉली अशी सुविधा करण्यात आली आहे. संबंधित सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या रायगड रोप-वेच्या चौथ्या ट्रॉलीची सर्व प्रकारची तांत्रिक चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वीदेखील झाली आहे. असे असले तरीही २३ एप्रिलला या चौथ्या ट्रॉलीचे लोकार्पण केले जाणार आहे. यातून शिवप्रेमी व पर्यटकांना सुविधा दिली जाणार आहे. रायगड किल्ल्यावर रोप-वेची सुविधा झाल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आता चौथी ट्रॉली जोडल्यामुळे पर्यटकांना थांबण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

......
शिवप्रेमी व पर्यटकांच्या सोयीसाठी चौथी ट्रॉली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ एप्रिलपासून ही सुविधा सुरू होईल. याचा शिवप्रेमी व पर्यटकांनी लाभ घ्यावा.
- राजेंद्र खातू, व्यवस्थापक, रोप-वे

.......
तिकीट दर सिंगल रिटर्न
समान्य नागरिक २०० ३१०
ज्येष्ठ नागरिक नाही २००
लहान मूल तीन फुटपर्यंत मोफत मोफत
लहान मूल तीन ते चार फुटांपर्यंत नाही २००
चार फुटाच्या वर २०० ३१०
अपंग व्यक्ती मोफत मोफत
शालेय विद्यार्थी सातवीपर्यंत १३० १९०
आठवी ते बारावीपर्यंत १९० २२५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com