श्रीराम मंदिर येथे वेदा जनजागृती मंचातर्फे समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला

श्रीराम मंदिर येथे वेदा जनजागृती मंचातर्फे समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला

वेदा जनजागृती मंचातर्फे समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला
महाड, ता. २८ (बातमीदार) : चवदार तळे येथील श्रीराम मंदिर येथे वेदा जनजागृती मंचातर्फे समाज प्रबोधनपर व्याख्यानमालेचे ३० एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
महाड शहरातील चवदार तळे श्रीराम मंदिरामध्ये रात्री आठ वाजता वेदा जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. दिगंबर गीते यांच्या समाज प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ एप्रिल रोजी ताणतणाव मुक्ती, वणवा- रोखा जंगल वाचवा, तर मंगळवार, ३० एप्रिलला समारोप समारंभ व यानंतर हभप विनायक शिंदे महाराज यांचे कीर्तन व महाप्रसाद असा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या व्याख्यानमालेला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चवदार तळे श्रीराम मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com