डीएसपीचा इंडेक्स फंड बाजारात

डीएसपीचा इंडेक्स फंड बाजारात

मुंबई, ता. १३ : डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सतर्फे डीएसपी क्रिसिल एसडीएल प्लस जी सेक इंडेक्स फंड बाजारात आणण्यात आला आहे. गव्हर्मेंट सिक्युरिटी, तसेच स्टेट डेव्हलपमेंट लोन्स यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी हा फंड आणला गेला आहे.

एप्रिल २०३३ रोजी मुदत संपणाऱ्या या ओपन एंडेड फंडामार्फत गव्हर्मेंट सिक्युरिटीज तसेच स्टेट डेव्हलपमेंट लोन्समध्ये निम्मी निम्मी गुंतवणूक केली जाईल. ज्या सरकारी साधनांची अवस्था चांगली असेल व ज्यांची खरेदी विक्री सहजतेने करता येईल, अशाच साधनांमध्ये यामार्फत गुंतवणूक केली जाईल. ज्या राज्य सरकारांचा जीडीपी व त्यांची एकूण देणी, कर्ज यांचे गुणोत्तर चांगले असेल अशा पाच राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या साधनांमध्ये प्रत्येकी दहा दहा टक्के गुंतवणूक केली जाईल. या वर्षी ३१ मार्चपूर्वी ते खरेदी केल्यास त्यांना मोठी करसवलतही मिळेल. या फंडात १९ जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल, अशी माहिती डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचे संदीप यादव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com