महिलांसाठी सन्मान योजनेवर प्रतिक्रिया

महिलांसाठी सन्मान योजनेवर प्रतिक्रिया

महिलांसाठी सन्मान योजनेवर प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ०१ : आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कष्टकरी, गरजू महिलेचा फारसा विचार केला गेला नसल्याची प्रतिक्रिया महिलांसाठी विविध पातळीवर काम करणाऱ्या क्षेत्रातून उमटत आहेत. महिलांसाठी कमी खुशी, जादा गम असा हा अर्थसंकल्प आहे. बचत गटाच्या सक्षमीकरणाचा उल्लेख अर्थसंकल्पात आलेला नाही. महिला सुरक्षेचा मुद्दा अर्थसंकल्पामध्ये नाही. महिला सन्मान सेविंगमध्ये १७ हजार रुपये ग्रामीण भागातील महिला गुंतवतील का? २०२४च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर झाला. महिला सन्मान बचत पत्र योजना अशी घोषणा केली गेली आहे, यात दोन लाखाची गुंतवणुक केल्यास वार्षिक ७.५०% व्याज महिलांना देण्यात येणार आहे, पण यात किती महिला स्वतः निर्णय घेवून वर्षाला दोन लाख गुंतवू शकतात? वर्षाला दोन लाख म्हणजे दर महिन्याला साधारण सतरा हजार होतात, एवढी गुंतवणूक करु शकणाऱ्या महिला किती आहेत? फक्त लोकप्रिय, मोठ्या घोषणांना अर्थ नाही.
- रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष

......
दोन लाख गुंतवणे, हे मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गीय महिलेसाठी शक्य होईल. कष्टकरी, गरजू महिलांची बचत नसते, त्यांचे कर्ज असते. महिला आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांना दिलासा नाही, त्यांच्यासाठी तरतूदही या अर्थसंकल्पात नाही. अंगणवाडी सेविकांसाठी जिथे मानधन वाढत नाहीम मग तिथे त्यांना गुणवत्ता कशी मिळतील, कुपोषित मुलांच्या आहारावर भर द्यावा, मानधन वाढावे या त्यांच्या गरजा आहेत, त्यावर काम केले पाहिजे.
- वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या

................
निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निम्नस्तरीय नागरिकांना याचा जास्त फर्क पडणार नाही. बचत गटातील महिलांना विना व्याजदर कर्ज देता आले तर महिला स्वतःचा व्यवसाय करु शकतात. ज्या योजना आधीपासून अस्तित्वात आहेत, त्यामध्ये जर कर्ज माफ झाले असते तर महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला असता. गुंतवलेली रक्कम उद्योगपतींना कर्ज देण्यासाठी वापरली जाते, त्यावर महिलांना दोन लाख रक्कम असेल, तरच साडेसात टक्के व्याज मिळेल नसेल तर काय? आणि कालांतराने योजनेत बदल झाले तर हे नियम ही बदलतात.
- ज्योती ठाकरे, अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ

.......
महिला अनेकदा सोन्यात पैसे गुंतवतात, त्याचबरोबर जर अशा योजनांमध्ये पैसे गुंतवले तर त्याचा फायदा होईल शिवाय रकमेवर मिळणारा व्याज दर ही चांगला आहे.
- प्राचार्य, डॉ.जयश्री अय्यर, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा.
..........

ही योजना कायमस्वरुपी असायला हवी कारण, दोन वर्षापर्यंतचा कालावधी वाढवला पाहिजे, सरकारची स्वतः ची यात काहीही गुंतवणुक नाही. योजना चांगली आहे पण वेळ आणि कालावधीची मर्यादा नसली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागातील महिलेच्या पैसे कमावण्याच्या पद्धतीत बराच फरक आहे सरकारने त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- वर्षा विलास, सामाजिक कार्यकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com