एडलवाईज इन्शुरन्स आता झुनो इन्शुरन्स

एडलवाईज इन्शुरन्स आता झुनो इन्शुरन्स

मुंबई, ता. ६ : एडलवाईज जनरल इन्शुरन्स आता झुनो जनरल इन्शुरन्स झाला असून ग्राहक मोटारीचा जेवढा व जसा वापर करतील तेवढ्याच रकमेचा हप्ता आकारणाऱ्या नव्या पॉलिसी त्यांनी बाजारात आणल्या आहेत.

एडलवाईज इन्शुरन्सला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीच्या एमडी व सीईओ शनाय घोष यांनी आज येथे ही माहिती दिली. या काळात कंपनीने तीस लाख ग्राहक जोडले असून त्यांच्याच संख्येइतकी नवी झाडेही कंपनीने लावली आहेत. पर्यावरण जपणूक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरता कंपनीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

कंपनीच्या नव्या विमा योजना या समजण्यास, काढण्यास आणि वापरण्यास अत्यंत सोप्या आहेत. या संदर्भात त्यांनी ग्राहकांचे सर्वेक्षण करून त्यानुसारच त्यांना हव्या तशा विमापॉलिसी बाजारात आणल्या आहेत. कोणताही प्रकारचा सर्वसाधारण विमा हा साधा, सोपा आणि सरळ असावा हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोटारीचा विमा उतरवणारे ग्राहक मोटार किती वापरतात, कशी वापरतात, किती चांगली चालवतात याआधारे तिच्या हप्त्याची किंमत ठरते. मोटार चांगल्याप्रकारे चालवा व कमी रकमेचा हप्ता द्या, मोटार कमी चालवा कमी रकमेचा हप्ता द्या, अशाही त्यांच्या पॉलिसी आहेत.

-----------------------------
मोबाईल टेलीमॅटिक्स ठरवणार हप्ता
मोटार तपासण्यासाठी कंपनीने त्यांच्या ॲपमध्ये मोबाईल टेलीमॅटिक्स आणले असून त्यातून मोटार चालवण्याची सर्व प्रकारची माहिती मिळते. त्याआधारे विमाहप्ता ठरवला जातो, असे शनाय घोष यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com