इंदूर मनपाच्या ग्रीन बाँडवर सव्वा आठ टक्के व्याज

इंदूर मनपाच्या ग्रीन बाँडवर सव्वा आठ टक्के व्याज

मुंबई, ता. ६ ः मध्य प्रदेशातील स्मार्ट सिटी असलेल्या इंदूर महापालिकेच्या सुरक्षित आणि अपरिवर्तनीय ग्रीन बाँडवर सव्वा आठ टक्के वार्षिक दराने व्याज मिळणार आहे. हे बाँड प्रत्येकी एक हजार रुपयांचे आहेत. या बाँडची नोंदणी राष्ट्रीय शेअर बाजारात होणार असून या बाँडच्या चार भागांचे वेगवेगळे व्यवहार होतील. हा इशू १२२ कोटी रुपयांचा असून तेवढ्याच रकमेचा झालेला जादा भरणाही स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार महापालिकेला मिळाला आहे. इंडिया रेटिंग अँड रिसर्चने या बाँडला इंडिया ए ए प्लस स्टेबल असा दर्जा दिला आहे; तर केअर रेटिंगने केअर ए ए स्टेबल असा दर्जा या बाँडला दिला आहे. बाँडची मुदत तीन, पाच, सात व नऊ वर्षे असून सहा महिन्यांनी त्याचे व्याज मिळू शकेल. १० ते १४ फेब्रुवारी या दरम्यान या बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. यात किमान दहा हजार रुपये व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल.

या रकमेतून खरगोन जिल्ह्यात ६० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाईल. इंदूर महापालिका ही केंद्र सरकारच्या अमृत योजनेमध्ये निवड झालेली असून इंदूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. चे ५० टक्के भागभांडवल महापालिकेकडे आहे. इंदूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. ची नोंदणी कंपनी कायद्यानुसार स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी झाली आहे. स्मार्टसिटी मिशन नुसार ही अंमलबजावणी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com