बुद्धांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी गर्दी

बुद्धांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी गर्दी

मुंबई, ता. १५ : तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश घेऊन परभणी ते चैत्यभूमी अशा निघालेल्या पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा बुधवारी (ता. १५) समारोप झाला. धम्मयात्रेनिमित्त थायलंडहून आणलेल्या बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर लोटला होता. समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
शांती आणि समतेचा संदेश देण्यासाठी परभणी ते चैत्यभूमी अशा धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खू सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सिनेअभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारीला ही यात्रा परभणी येथून सुरू झाली. ही पदयात्रा जालना, औरंगाबाद, नाशिक, कल्याण, ठाणेमार्गे चैत्यभूमीवर पोहोचली. पदयात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायांनी उपस्थिती लावली. बुद्धांच्या अस्थींचे दर्शन व्हावे, यासाठी सकाळपासूनच चैत्यभूमीवर मोठी गर्दी झाली होती.
---
बौद्ध धम्माच्या माध्यमातून अवघ्या जगात बुद्धांचा शांतीचा संदेश पोहोचला आहे. जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असून अनेक जण या विचारांकडे वळत आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री
----
आनंदराज आंबेडकर म्हणाले की आज

विविध कारणांमुळे आज जगभर अस्थिरता पसरली आहे. त्यामुळे विकासाचा मार्ग हा बुद्ध विचारांमध्ये आहे. अवघे जग बुद्ध विचारांकडे वळत असून बुद्ध विचारांशिवाय पर्याय नाही.
- आनंदराज आंबेडकर, प्रमुख, रिपब्लिकन सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com