थिएटर ही अभिनेते घडवण्याची फॅक्टरी : अभिनेता संतोष जुवेकर

थिएटर ही अभिनेते घडवण्याची फॅक्टरी : अभिनेता संतोष जुवेकर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ‘थिएटर ही अभिनेते घडवण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये अनेक दर्जेदार कलाकार घडले आहेत. मीदेखील अशाच फॅक्टरीचे ‘प्रॉडक्ट’ असून तेथेच माझ्या अभिनयाचे ‘सर्व्हिसिंग’ झाल्याचे प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर यांनी सांगितले. आज त्यांनी ‘यिन मिनिस्ट्री’च्या ‘मनोरंजन-सेलिब्रेटी’ या सदरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
‘कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी ‘पॅशन’ महत्त्वाची आहे. सुरुवातीच्या काळात मी नाटकांवर अधिक भर दिला. नाटकात खूप ताकद आहे. तेथूनच तुम्ही कसदार अभिनेते बनता; मात्र थिएटरच्या कलाकारांना योग्य मानधन मिळत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. चांगले पैसे मिळाले तर थिएटर अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वासही जुवेकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील लोकांनी मराठीला प्रेम द्यावे. आपला चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघा. त्यातून मराठी सिनेमाला कदाचित चांगले दिवस येतील, असेही त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक संदर्भ घेऊन अनेक या चित्रपटांची निर्मिती होत आहे. मात्र चित्रपट बनवताना इतिहासाची तोडफोड नको. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्थानिक चित्रपटसृष्टीदेखील आहे. तेथील वेगवेगळे प्रयोग बघायला मला आवडतात. त्यांनी स्वतःच्या कक्षा रुंद करायला हव्यात. कुठल्याही क्षेत्रामध्ये फक्त टॅलेंट महत्त्वाचे नाही, तर ‘सेल’ करणेदेखील यायला हवे. हा नियम चित्रपटसृष्टीला देखील लागू होतो. याशिवाय कुठल्याही कामावर एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या वाट्याला एकसारख्याच भूमिका आल्या तरी त्या वेगवेगळ्या प्रकारे करण्याची आपली धडपड हवी, असेही ते म्हणाले.
...
पैसे घ्यायचे!
सध्या समाजमाध्यमांची चलती आहे. चांगला वापर केलात तर त्याची नक्कीच मदत होईल. सध्या वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून लोकांची फसवणूक करायचे प्रकार सुरू आहेत. त्याला बळी पडू नका. चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्याचे पैसे घ्यायचे असतात. कधीही पैसे द्यायचे नाहीत, हा मंत्रही त्यांनी शेवटी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com