गेट वे ऑफ इंडिया येथे
आज लाईट ॲण्ड साऊंड शो

गेट वे ऑफ इंडिया येथे आज लाईट ॲण्ड साऊंड शो

मुंबई, ता. २७ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तथा ब्रिटीश सैन्य दलाच्या माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे उद्या (ता. २८) रात्री ८ वाजता लाईट ॲण्ड साऊंड शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाईट ॲण्ड साऊंड शोला २८ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील काही आठवडे दर शनिवारी आणि रविवारी होणारा हा कार्यक्रम ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘प्रगतीशील भारत’ संकल्पनेवर आधारित आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानावरही या शोच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे लोढा म्हणाले.
या सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, इंडियन ऑईलचे निदेशक (विपणन) व्ही. सतीश कुमार उपस्थित राहणार असल्याचे महिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com