आयसीआयसीआय लोंबार्डचा महिला सक्षमीकरण उपक्रम

आयसीआयसीआय लोंबार्डचा महिला सक्षमीकरण उपक्रम

मुंबई, ता. ७ : आयसीआयसीआय लोंबार्डने महिला सक्षमीकरणाचे उपक्रम फक्त महिला दिनाच्या दिवशीच मर्यादित ठेवले नसून त्यानिमित्ताने हा महिनाभर देशात सर्वत्र महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि मोटारींबाबत तांत्रिक साह्य केले जाणार आहे.
आयसीआयसीआय लोंबार्डतर्फे मार्च २०२३ हा महिना महिला महिना म्हणून साजरा केला जाईल. भारतातील प्रमुख केंद्रांवर दहा हजार महिलांसाठी ही आरोग्य तपासणी मोहीम राबविली जाईल. यात सीबीसी, थायरॉईड प्रोफाइल, व्हिटॅमिन डी आणि बी १२, आरबीएस, फेराटीन (आयर्न स्टडी) आदी चाचण्यांचा समावेश असेल. आयएल टेककेअर अॅपद्वारे या सेवांचा लाभ घेता येईल. तसेच महिला एजंट व प्रतिनिधी यांची नियुक्ती व शिक्षण यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल. तसेच महिला वाहनचालकांसाठी कंपनीतर्फे सहायता केंद्रेही उभारली जातील. वाहन चालवताना मोटारीतील बिघाड, अपघात, टायरची हवा जाणे, इंधनाची हानी, विद्युत बिघाड इत्यादी अडचणींवर या केंद्रातून मदत मिळू शकेल. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतातील १५ ते ४९ केवळ ३० टक्के महिलांना आरोग्य संरक्षणाचे कवच मिळाले आहे. यामुळे महिला लोकसंख्येचा एक मोठा भाग विम्याशिवायच आहे. त्यांना आरोग्य विम्याच्या छताखाली आणण्यासाठीही यादरम्यान प्रोत्साहन दिले जाईल, असे आयसीआयसीआय लोम्बार्डचे विशेष संचालक संजीव मंत्री यानिमित्ताने म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com