बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्ज व्याजदरात घट

बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्ज व्याजदरात घट

मुंबई, ता. ८ : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली असून आता हे कर्ज मर्यादित काळासाठी साडेआठ टक्के व्याजदराने मिळेल. त्यांचे एमएसएमई कर्जदेखील ८.४० टक्के दराने मिळेल. ही सवलत फक्त ३१ मार्चपर्यंत आहे.

सध्याच्या इतर बँकांच्या प्रचलित गृहकर्ज व्याजदरापेक्षा हे दर पुष्कळ कमी असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या कालावधीत बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कही (प्रोसेसिंग फी) संपूर्ण माफ केले आहे; तर एमएसएमई कर्जावर त्यांनी प्रक्रिया शुल्क ५० टक्के कमी केले आहे. गृह कर्जासाठी साडेआठ टक्के दराची सुविधा नव्या कर्जांसाठी, तसेच अन्य बँकांमधून बँक ऑफ बडोदामध्ये कर्ज हस्तांतरित करण्यासाठीही लागू राहील. कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट स्कोरशी हे सवलतीचे व्याजदर निगडित असतील, अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक अजय खुराणा यांनी दिली. सध्याच्या महाग गृहकर्ज व्याजदराच्या काळात ही सवलत घर घेणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. तसेच छोट्या उद्योजकांनाही व्याजदर घटवल्याने त्यांना आपल्या उद्योगांची वाढ करता येईल, असेही ते म्हणाले. आता कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांनी बीओबी वर्ल्ड मोबाईल बँकिंग अॅपवर नोंदणी केल्यास किंवा बँकेच्या वेबसाईटवर अर्ज केल्यास तीस मिनिटांत गृहकर्ज मंजूर होईल. कोणत्याही शाखेतूनही हे कर्ज मिळू शकेल, यासाठी अत्यंत कमी कागदपत्रे लागतील. या कर्जाची परतफेड तीस वर्षांपर्यंत होऊ शकते, कर्ज आधीच फेडल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com