एशियाटिक सोसायटीला एक कोटी अनुदान

एशियाटिक सोसायटीला एक कोटी अनुदान

सकाळ वृत्तसेवा

मुबई, ता. ८ - निधीअभावी आर्थिक डबघाईस आलेल्या एशियाटिक सोसायटीला वार्षिक १ कोटी रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३० मे २०२२ रोजी एशियाटीक सोसायटीच्या समस्येबाबत बैठक झाली होती. या बैठकीत सोसायटीला राज्य सरकारकडून वार्षिक १ कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश पवार यांनी दिले होते. या निर्णयाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आज (बुधवारी) प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षापासून एशियाटीक सस्थेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एशियाटिक सोसायटीसाठी मंजूर केलेला निधी वेतनेतर असून तो खर्च करताना काही अटी राज्य सरकारने घालून दिल्या आहे. यामध्ये प्रामुख्याने निधी हा नियतकालिके, पुस्तकांची खरेदी, प्रक्रिया प्रयोगशाळा संवर्धन आणि मायक्रोफिल्मिंग लॅबच्या खर्चासाठी वापरायचा आहे. मात्र एशियाटीक संस्थेला मुंबई महापालिकेकडून वार्षिक १ कोटी रुपयाचे अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे त्यासाठी अनूकूल असल्याचे समजते. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंर महापालिका अनुदान देईल, असे आश्वासन चहल यांनी दिले होते.

कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या कायम
राज्य सरकारचा निधी हा एशियाटिक सोसायटी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते या बाबींवर खर्च करता येणार नाही. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने करावा, असे शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रंलबित राहणार आहे. मात्र ही मोठी मदत आहे. आम्ही आनंदी असल्याची प्रतिक्रया संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com