आरोग्य कर्मचारी १४ मार्चपासून संपावर

आरोग्य कर्मचारी १४ मार्चपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. परिणामी राज्यातील आरोग्य सेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकारी-निम सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तत्काळ लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करा, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरा, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाकडून १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. मुंबईतील राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय आणि कामा रुग्णालयातील सर्व तृतीय आणि चतुर्थ कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. मागण्यांचे निवेदन जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिल्याची माहिती रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com