जनावरांची शवदाहिनीला जुलैमध्ये मुहूर्त

जनावरांची शवदाहिनीला जुलैमध्ये मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महापालिकेने मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी पहिली शवदाहिनी जुलै २०२३ पासून मालाड येथे सुरू होणार आहे. शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे भटक्या श्र्वानांसह अन्य जनावरांच्या विल्हेवाटीसाठी खासगी शवदाहिनीवर अवलंबून राहावे लागणार नाही.
मुंबई शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. शहरापेक्षा उपनगरांमध्येही आवड अधिक जपली जाते. मुंबई महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार पाळीव प्राण्यांची संख्या सुमारे ४० ते ४५ हजारांच्या घरात आहे. यामध्ये श्वान आणि मांजरांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्नदेखील मोठा आहे.
मुंबईतील पाळीव जनावरे मृत झाल्यानंतर त्यांच्या विल्हेवाट्याचा प्रश्न महापालिकेला भेडसावत होता. पॅरिससह जगभरातील अन्य काही देशांमध्ये प्राण्यांसाठी स्वतंत्र दफनभूमी तसेच शवदाहिनीची व्यवस्था आहे. त्या धर्तीवर मुंबई महापालिकेने पुढाकार घेत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथे मृत जनावरांच्या विल्हेवाटसाठी शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला.
...
सध्या ‘खासगी’त विल्हेवाट
सध्या मृत जनावरांची परळ व बोरिवली कोरा केंद्र येथे असलेल्या शवदाहिनीमध्ये विल्हेवाट लावण्यात येते. या शवदाहिनी खासगी असून जनावरांच्या वजनानुसार पैसे आकारण्यात येतात. एक किलो मासाच्या विल्हेवाटसाठी सुमारे १५ ते २० रुपये असा दर आहे. त्यामुळे एका मृत कुत्र्याच्या विल्हेवाटसाठी १५० ते २०० रुपये; तर मोठ्या जनावरांच्या विल्हेवाटसाठी सरासरी ६०० ते ७०० रुपये खर्च येत आहे.
...
या ठिकाणी प्रकल्प
महापालिकेने सध्या महालक्ष्मी, मालाड व देवनार येथे जनावरांसाठी शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून यापैकी मालाड शवदाहिनीचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. मालाडनंतर देवनार महालक्ष्मी शवदाहिनी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या शवदाहिनीमध्ये तासाभरात ५० किलो मासाची विल्हेवाट लावता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com