दहावी-बारावीच्या पेपर तपासणीला वेग

दहावी-बारावीच्या पेपर तपासणीला वेग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : जुन्या पेन्शन योजनेवरून सुरू असलेला सात दिवसांचा बेमुदत संप सोमवारी (ता. २०) अखेर मागे घेण्यात आला. त्यानंतर आज राज्यात दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगात सुरू झाले. तसेच सात दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आयटीआयही सुरू झाले आहेत. संपामुळे दहावी-बारावीच्या तब्बल ९० लाखांच्या दरम्यान उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत; मात्र आता त्यांच्या तपासणीचे काम सुरू झाल्याने निकालासंदर्भातील संभ्रमावस्था दूर झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबई उपसंचालक विभागात अनुदानित, अंशत: अनुदानित, खासगी अनुदानित, समाजकल्याण, आदिवासी विभाग आदी विभागाच्या ४९ हजारांहून अधिक शाळा असून त्यामध्ये असलेले ४१ हजारांहून शिक्षक तसेच आयटीआयमधील सुमारे दोन हजार शिक्षक बेमुदत संपात सहभागी झाले होते. त्यामुळे पहिलीपासून ते ११ वीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये बंद होती; मात्र आता ती सुरळीत सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. संपादरम्यान शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनेक कामे रखडल्याने त्यासाठी अधिकचा वेळ देऊन आम्ही सर्व कामकाज उरकणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com