न्या. डेरे यांच्याकडील
खटले अन्य खंडपीठाकडे

न्या. डेरे यांच्याकडील खटले अन्य खंडपीठाकडे

मुंबई, ता. २४ : फौजदारी फिर्यादीसंबंधित याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आदींच्या याचिकेवर या खंडपीठाने यापूर्वी निर्णय दिला आहे.
न्या. डेरे यांच्या खंडपीठाचे काम आता न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एम. एम. साठये यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. उच्च न्यायालय प्रशासनाच्या निर्णयानुसार २७ मार्चपासून हा बदल होणार आहे. यापूर्वीही असे अंशतः बदल करण्यात आले आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. न्या. डेरे यांच्याकडील कामकाज न्या. शुक्रे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
न्या. डेरे यांच्या खंडपीठापुढे दापोली रिसॉर्ट प्रकरणात परब यांनी केलेल्या याचिकेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ, कोचर, व्हिडीओकोन आदी याचिकांवर सुनावणी झाली होती. कोचर यांच्या याचिकेत हस्तक्षेप करणाऱ्या याचिकादारांना न्यायालयाने नकार दिला होता, तर मुश्रीफ यांच्या याचिकेमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना एफआयआर प्रत आधी मिळण्याबाबत न्यायालयीन चौकशी लावली आहे. मनसुख हिरेन हत्या खटल्यात चकमकफेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्माला खंडपीठाने जामीन नाकारला होता, तसेच एनआयएला तपास कामावर खडेबोलही सुनावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com