फिटनेस चाचणीत बेस्ट पास!

फिटनेस चाचणीत बेस्ट पास!

मुंबई, ता. २६ : बेस्टच्या कंत्राटदारांकडून चालवण्यात येणाऱ्या तीन एसी बसना अवघ्या १५ दिवसांत आगी लागण्याच्या घटना घडल्यानंतर त्यांची फिटनेस चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता सर्व एसी बसची चाचणी पूर्ण झाली असून त्या रस्त्यावर धावू लागल्या असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

एसी बसना सातत्याने आग लागत असल्याने बेस्टने त्याची गंभीर दखल घेतली होती. २१ फेब्रुवारीपासून बेस्ट प्रशासनाने मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणारी ४०० बसची सेवा थांबवत त्यांची फिटनेस चाचणी करून घेतली. कंपनीच्या सुमारे ४०० एसी बसची चाचणी करण्याचे निर्देश बेस्टने ठेकेदाराला दिले होते. त्यानंतर टाटा मोटर्स इंजिनिअरिंगची एक टीम लखनौहून बोलावण्यात आली. टीमच्या सदस्यांनी सुरक्षा मानके आणि नियमांचे पालन करण्यासाठी सर्व बसची पुन्हा तपासणी केली. आठ ते दहा जणांच्या टीमद्वारे बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली. बसचे इंजिन, सीएनजी पुरवठा, विजेची व्यवस्था इत्यादी बाबींची कठोर तपासणी करण्यात आली. साधारण महिनाभर तपासणी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या.

प्रवाशांना दिलासा
तुटवडा भरून काढण्यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यातील बस रस्त्यावर उतरल्या; तरीही बसचा तुटवडा जाणवत होता. त्याचा परिणाम प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ आणि मरोळ बस आगारांवर झाला होता. परिणामी सकाळपासूनच आगारांसह बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी होत होती. बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि आगार नियंत्रकांत वादावादी सुरू होत होती. नुकत्याच सर्वच्या सर्व बसची फिटनेस टेस्ट पूर्ण होऊन त्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com