राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. मंगळवारी (ता. २८) मुंबईत १३५ नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली; तर राज्यात ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली असून तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता आलेख पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या २१ हजारांच्या घरात पोहोचली होती. मृत्यूचा आकडाही शंभरीपार गेला होता; मात्र आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले असले, तरी पुन्हा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात कोरोनाबाधित १३५ नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५६ हजार ५८५ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. आज दिवसभरात ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ११ लाख ३६ हजार १७५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या ६६३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात आज दिवसभरात ४५० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४२ हजार ५०९ वर पोहोचली आहे; तर तीन रुग्ण दगावले आहेत. राज्यात ३१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७९ लाख ९१ हजार ७२८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com